पुणे

पुणे : विचारशून्यता ही देशापुढील मोठी समस्या : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशात विचारभिन्नता ही समस्या नाही, तर विचारशून्यता ही समस्या असल्याची खंत केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (दि. 11) व्यक्त केली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनलिखित 'इंडियन फिलोसॉफी' या पुस्तकाचा मराठी अनुवाद असलेल्या भारतीय तत्त्वज्ञान खंड 1 व 2 या भागाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते.

विमाननगर येथील सिम्बायोसिसच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमावेळी डॉ. अशोक मराठे, डॉ. अनुपमा क्षीरसागर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, 'भारतीय तत्त्वज्ञान विश्वाचे कल्याण करणारे आहे. सर्वसमावेशकता, सहिष्णुता भारतीय तत्त्वज्ञानात आहे. न्यायव्यवस्था व नीतीमूल्ये ग्रंथसंपदांमधून मिळाली आहे.' प्रणवतीर्थ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

SCROLL FOR NEXT