बारामती मध्ये आज कृषक कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे दुग्धविकासाठी, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी शरद पवार येतील आणि दोन्ही पवार पुनः एकदा एकच मंचावर दिसतील अशी अपेक्षा होती. मात्र शरद पवारांनी या उद्घाटनाला येण्याचे टाळले. उद्घाटनानंतर जाहीर कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांनी अजित दादांना पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली.
या आठवणीचे निमित्त असे झाले कि आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी अजित दादांनी काल फोन करून कृषीमंत्र्यांना सांगितलं की उद्या सकाळी लवकर या. यावर पुढे बोलताना कृषीमंत्री यांनी त्यांची उशिरा उठायची सवय विषद केली. मात्र दादांच्या सांगण्यावरून लवकर उठलो असेही त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणल, " दादा जेव्हा जेव्हा सांगतील तेव्हा मी त्यांच्या मागे उभा राहिलो आहे. अगदी पहाटेच्या शपविधी वेळीही मी त्यांच्या मागेच होतो. खुद्द कृषीमंत्र्यांनीच विनोदात का होईना या शपथविधीची आठवण करून दिल्याने दादांसह सगळ्यांनीच हसून दिलखुलास दाद दिली.