पुणे

पुण्यात सगर उत्सवात शंभर रेडे सहभागी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून, बुधवारी दिवाळीच्या भाऊबीज साजरी केली जात आहे. तर दुसरीकडे वर्षभर दूध देणाऱ्या जनावरांना सजवून त्यांची मिरवणूक काढून पुण्यातील गणेश पेठेत पुणे शहर आणि जिल्हा दुग्धव्यवसायिक संघाच्यावतीने सगर उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 100 रेडे आणि म्हैस यांना सजवून आणण्यात आले होते. पुण्यातील गणेश पेठेत या सगर कार्यक्रमात गवळी समाजाकडून त्यांच्याजवळ असलेल्या जनावराला फुले, मोरपीस, तसेच अंगावर विविध स्टाईल ची कटिंग करत, शरीरावर तसेच शिंगांवर विविध कलर लावून डिजे, ढोल तसेच बँड पथक घेऊन जाऊन रेड्यांचा प्रदर्शन करण्यात आले. पुण्यात सुमारे 100 वर्षापासून गणेश पेठ येथे हा सगर उत्सव साजरा केला जातो. सगर म्हणजे गवळी समाज बांधव आपल्या जनावरांचं दिवाळी पाडव्याच्या दिवशी पूजन करतात. तसंच त्या सणाच्या दुसऱ्या दिवशी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढतात.आणि या रेड्यांच सत्कार देखील करण्यात येत.

यावेळी दूध विक्रेता संघाचे अध्यक्ष विश्वास सोनवणे म्हणाले, हिंदू धर्मात दिवाळी ला खूप महत्त्व आहे. दिवाळीत भाऊबीजेला आमचे जे जनावर आहे, ज्याचं वर्षभर आम्ही दूध विकतो आणि आमचं संसार चालवतो. अश्या जनावरांच ऋण फेडण्यासाठी सगर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असत. राज्यातील विविध भागात या सगर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असत. जवळपास 100 हून अधिक रेडे यात सहभागी होत असतात.

SCROLL FOR NEXT