पुणे; पुढारी वृत्तसेवा: सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त येथील महेश सहकारी बँकेने रविवारी (दि.18) कोंढवा येथील महेश सांस्कृतिक भवनात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. तब्बल 1 हजार 561 बाटल्या रक्ताचे संकलन झाल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोमेश्वर करवा यांनी दिली.
या शिबिरास अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभेचे सभापती श्यामजी सोनी, उद्योगपती विठ्ठलशेठ मणियार, पुरुषोत्तम लोहिया, शरद सारडा, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशचे अध्यक्ष अॅड सुभाष मोहिते, अनेक संघटनांचे पदाधिकारी व अन्य मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. बँकेचे अध्यक्ष पूनमचंद धूत व उपाध्यक्ष जुगलकिशोर पुंगलिया यांनी सर्व रक्तदात्यांचे, संचालक व सेवक वर्गातर्फे आभार मानले.