पुणे

पुणे : आरटीई प्रवेशासाठी उदंड प्रतिसाद

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांच्या पहिली आणि नर्सरीच्या प्रवेशासाठी सुरू असलेल्या प्रवेशप्रक्रियेला पालकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. अर्ज भरण्यास 1 मार्चला सुरुवात झाल्यानंतर तीनच दिवसांमध्ये तब्बल 42 हजार 460 पालकांनी आपल्या मुलांचे अर्ज भरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरटीई प्रवेशप्रक्रियेद्वारे स्वयंअर्थसाहाय्यित, खासगी विनाअनुदानित, खासगी कायम विनाअनुानित शाळांमध्ये मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येत असते. प्रवेशप्रक्रियेला बुधवारी (दि. 1) सुरुवात झाली. तर पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी 17 मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. यंदाच्या आरटीई प्रवेशप्रक्रियेत 8 हजार 828 शाळा असून, त्यामध्ये 1 लाख 1 हजार 969 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

पुणे जिल्ह्यात 936 शाळांमध्ये 15 हजार 655 प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. यासाठी 9 हजार 346 बालकांचे अर्ज नोंदविण्यात आले आहेत. नागपूरमध्ये 5276, ठाण्यात 3868, नाशिकमध्ये 2568, छत्रपती संभाजीनगरात 2079, रायगडमध्ये 1805, मुंबईमध्ये 2109, अहमदनगरमध्ये 1135 जळगावमध्ये 1306 नांदेडमध्ये 1188 याप्रमाणे अर्ज नोंदणी झाली आहे.

प्रवेशासाठी आणखी एक लिंक
सर्व पालक आरटीई प्रवेश अर्ज भरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन संकेतस्थळ 'स्लो' होऊ शकते, त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता, काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, अशी सूचना आरटीईफ पोर्टलवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर आता आणखी एक लिंकदेखील पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे दोन्ही लिंकवर पालकांना आपल्या पाल्यांचे अर्ज भरता येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT