Dog Attack Safety Tips | श्वान अंगावर धावून आल्यास काय कराल? 
पुणे

Dog Attack Safety Tips | श्वान अंगावर धावून आल्यास काय कराल?

पुढारी वृत्तसेवा

पुणे : राज्यभरात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक आणि एकटे पायी चालणार्‍या नागरिकांवरील हल्ल्यांच्या घटना चिंताजनकरीत्या वाढत आहेत. शुक्रवारी पुण्यात एका लहान मुलावर भटक्या श्वानाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात मुलगा सुदैवाने बचावला. मात्र, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही भागांत श्वानांच्या टोळ्या वाहनचालकांवरही धावून जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. श्वान अंगावर धावून आल्यास काय खबरदारी घ्यावी? काय करावे आणि काय नाही? याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.

श्वान अंगावर धावून आल्यास हे करा

* घाबरून पळू नका. पळाल्यास श्वान अधिक आक्रमक होतो.

* स्थिर उभे राहा. हात खाली ठेवून शांत उभे राहा.

* डोळ्यांत डोळे रोखून पाहू नका. हे आव्हान मानले जाऊ शकते.

* हळूहळू मागे सरका. पाठ फिरवू नका; हळूच लांब जा.

* जवळ वस्तू असेल, तर ढाल म्हणून वापरा.

* शांत; पण ठाम आवाजात जा किंवा हट म्हणा. ओरडू नका.

काय करू नये?

दगड मारणे किंवा उचकावणे टाळा.

काठीने हाणण्याचा प्रयत्न करू नका.

लहान मुलांना एकटे सोडू नका.

श्वान झोपलेला असताना जवळ जाऊ नका.

श्वान चावल्यास तत्काळ काय करावे?

जखम त्वरित साबण आणि वाहत्या पाण्याने 10-15 मिनिटे स्वच्छ धुवा.

जखमेवर अँटिसेप्टिक लावा. शक्य तितक्या लवकर जवळच्या रुग्णालयात जा.

डॉक्टरांच्या सल्ल्याने रेबिज प्रतिबंधक लस घ्या.

रेबिज हा जीवघेणा आजार असल्याने उपचारात विलंब करणे धोकादायक ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT