पुणे : पुढारी वृत्तसेवा
वाहतूक नियमांचे उल्लंघन लोक वारंवार करताना दिसत आहेत. सार्वजनिक वाहतुकीतील गर्दी आणि वेळ वाया जाऊ नये म्हणून खासगी वाहनांचा वापरण्यावर लोकांचा जास्त कल असतो. अशावेळी तुम्ही कळत-नकळत जर या नियमांची पायमल्ली केली, तर ट्रॅफिक पोलिसांनी तुमचं चलन कापलंच म्हणून समजा. आपल्या वाहनाचे चलन पोलिसांनी कापले आहे की नाही हे पाहणं अगदी सोपं आहे. ते कसं पाहायचं याच्या सोप्या स्टेप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जर आपण खासगी वाहनाने प्रवास करत असाल तर कधीना कधी आपले चलन कापले गेले असेल. वाहतूक पोलिसांनी आपलं चलन कापलंय हे कधी-कधी आपल्याला कळतही नाही. याबाबतची माहिती अनेकदा एसएमएसद्वारे मिळते. पण अनेक वेळा तर तेही कळत नाही.
Union Budget 2022 : क्रिप्टोकरन्सीबाबत मोठा निर्णय; क्रिप्टोकरन्सीच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार
सर्वप्रथम तुम्ही https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. आता वेबसाइटवर चेक ऑनलाईन सर्व्हिस या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर चेक चलन स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. स्क्रीनवर तुम्हाला चलन क्रमांक, वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक चे पर्याय दिसतील. येथे तुम्हाला वाहन क्रमांक या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक येथे टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या गाडीचा चॅसीज नंबर किंवा इंजिन नंबर टाकावा लागेल. जो तुम्हाला तुमच्या RC बुक किंवा कार्डवर पाहाता येतो. आता तुम्हाला कॅप्चा कोड भरावा लागेल. यानंतर तुम्हाला 'गेट डिटेल'या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला कळेल की तुमचे चलन कापले गेले आहे की नाही.
या https://echallan.parivahan.gov.in वेबसाइटवर जाऊन चलना संबंधित सर्व माहिती भरा. त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि गेट डिटेल या पर्यायावर क्लीक करा. आता तुमच्या चलनाची माहिती नवीन पेजवर उघडेल. कोणते चलन भरायचे तो पर्याय निवडा. चलनासोबत ऑनलाइन पेमेंट करण्याचा पर्याय असेल. तो पर्यायही निवडा. त्यानंतर तेथून पेंमेंट संबंधित सर्व माहिती भरा. अशाप्रकारे तुमचा चलन भरले जाईल.
ट्रॅफिक पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तुमचे चलन कापत असेल, तर या परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे हे तुम्हाला आधीच माहीत असेल, तर तुम्ही न चुकता तेथून बाहेर पडु शकता. याशिवाय चुकीचे चलन कापले जात असेल, तर तुम्ही वाहतूक पोलिस कक्षाशी संपर्क साधू शकता. तेथे तुम्ही संबंधित अधिकार्याशी बोलून तुमची बाजू मांडू शकता आणि तुमच्या युक्तिवादाने ते समाधानी झाले, तर तुमचे चलन रद्द केले जाऊ शकते