Global Capability Centers Pudhari
पुणे

Future of Work: ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स; व्यवसाय परिवर्तनाचे केंद्र

Global Capability Centers: ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCCs) आता केवळ खर्च व ऑपरेशनपुरते मर्यादित न राहता नवकल्पना व व्यवसाय परिवर्तनाची केंद्रे बनत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

The New Innovation DNA of GCCs: ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCCs) आज ज्या वेगाने बदलत आहे, ते उद्योगक्षेत्रात मोठे परिवर्तन घडवणारे आहे. एकेकाळी केवळ खर्चात बचत करत आणि मोठ्या प्रमाणात कामकाज हाताळण्यापुरते ओळखले जाणारे GCCs आता व्यवसायासाठी रणनीती, नवीन कल्पना आणि भविष्यनिर्मिती याचे केंद्र बनले आहे. मेटलाइफ ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशीष के. श्रीवास्तव म्हणतात, “भविष्यातील GCCs हे फक्त ऑपरेशनल पुरते मर्यादित नसतील; ते संस्कृती, सहयोग आणि कौशल्यविकासाद्वारे जागतिक प्रभाव निर्माण करतील.”

संस्थेची खरी ताकद

एकेकाळी ‘सॉफ्ट’ समजली जाणारी संस्थात्मक संस्कृती आज GCCs मध्ये सर्वाधिक निर्णायक ठरत आहे. ही केंद्रे आता मूळ संस्थेची संस्कृती जशीच्या तशी कॉपी न करता, ती स्थानिक वास्तव, स्थानिक मूल्ये आणि कर्मचार्‍यांच्या गरजांनुसार रूपांतरित करत आहेत.

नवकल्पना GCCs च्या केंद्रस्थानी येत आहेत. येथे ‘फेल फास्ट, लर्न फास्टर’ ही भूमिका आहे.

  • कर्मचार्‍यांना लहान- मोठे प्रयोग करण्याची मुभा,

  • आवश्यक साधने व संसाधने,

  • आणि प्रयोगातून मिळालेल्या अनुभवांना शिकण्याचे साधन म्हणून स्वीकारणे
    ही संस्कृती अधिक वेगाने विकसित होत आहे.

यामुळे टीम्स अधिक निर्भयपणे काम करतात, नवे उपाय शोधतात आणि डिजिटल तसेच व्यवसायिक परिवर्तनाला गती मिळते.

GCCs आता फक्त समर्थन यंत्रणा नसून, ते जागतिक टीम्ससोबत खऱ्या अर्थाने सह-सर्जन (co-creation) करत आहेत.
कौशल्यविकास हे त्यांचे मोठे शस्त्र आहे—

  • भविष्यातील तंत्रज्ञानातील विशेषज्ञता,

  • क्रॉस-फंक्शनल शिक्षण,

  • आणि जागतिक प्रोजेक्ट्सवर काम करण्याच्या संधी
    यामुळे ही केंद्रे प्रतिभावान व्यावसायिकांचे केंद्रबिंदू बनत आहेत.

संस्कृती, सहयोग आणि क्षमता उभारणी यांचे हे त्रिकूट GCCs ला पारंपरिक भूमिकेपलीकडे घेऊन जात आहे. आगामी काळात ज्या संस्थांची संस्कृती मजबूत असेल, नवकल्पनांना खतपाणी दिले जाईल आणि कर्मचारीविकासाला प्राधान्य असेल तेच स्पर्धेत टिकू शकतील.

- आशीष के श्रीवास्तव, सिनीयर व्हाईस प्रेसिडेंट आणि मॅनिजिंग डायरेक्टर, मेटलाइफ ग्लोबल केपेबिलिटी सेंटर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT