मानसिक आरोग्य  pudhari
पुणे

मानसिक तणावात हेल्पलाइनचा आधार

पुढारी वृत्तसेवा

नातेसंबंधांतील गुंतागुंत...एखाद्या घटनेबद्दल, व्यक्तीबद्दलची भीती... आर्थिक, सामाजिक, भावनिक अस्वास्थ्य अशा नानाविध कारणांमुळे मानसिक ताणतणाव निर्माण होतात. तणाव हाताळण्यासाठी विविध हेल्पलाइन्सच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला जात आहे.

मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे गेल्या 20 वर्षांपासून हेल्पलाइन चालवली जात आहे. यावर्षी राज्यभरातून मुक्ता हेल्पलाइनवर 10 हजार 890 कॉल आले आहेत. सुमारे 2250 कॉलर्सना कॉल बॅक सेवा देऊन मानसिक अस्वस्थेपासून परावृत्त करण्यात आले.

पुण्यातील कनेक्टिंग ट्रस्ट ही स्वयंसेवी संस्था गेल्या 12 वर्षांपासून हेल्पलाइनच्या माध्यमातून नैराश्यग्रस्त लोकांना तिमिरातूनी तेजाकडे नेण्याचे काम करत आहे.

हेल्पलाइन ठरताहेत फायदेशीर

आयुष्याच्या विविध टप्प्यांवर अनुभवांतून काही गोष्टी ठरवून टाकलेल्या असतात, दृष्टिकोन बनवलेला असतो. पठडीच्या बाहेर विचार करण्याची आपली क्षमताच संपते आणि त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. आपली अडचण कोणी ऐकून घेईल का, गुप्तता पाळेल का, आपली खिल्ली तर उडवणार नाही ना, असे अनेक प्रश्न सतावत असतात. प्रत्येकाची परिस्थिती, नैराश्येचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यासाठी हेल्पलाइन फायदेशीर ठरतात.

मानसिक आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोलून, तत्काळ प्रतिक्रिया न देता किंवा प्रश्नांची सरबत्ती न करता केवळ ऐकून घेणे महत्त्वाचे असते. यासाठी आमची समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञांची टीम 20 वर्षांपासून कार्यरत आहे. त्याव्यतिरिक्त सपोर्ट ग्रुप तयार करणे, मानसिक आरोग्य कार्यशाळा आयोजित करणे, तणावाखाली असलेल्यांमध्ये विश्वास निर्माण करणे, नकारात्मक विचारांपासून परावृत्त करणे यासाठी आम्ही काम करत आहोत.
डॉ. रूपा अग्रवाल, सहसंस्थापक, मुक्ता मानसिक आरोग्य हेल्पलाइन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT