पुणे

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवानिमित्त पुण्यात जड वाहनांना बंदी

अमृता चौगुले

पुणे : गणेशोत्सवानिमित्त शहराच्या विविध भागांत गणपती विसर्जनापर्यंत जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. तसेच काही मार्गांवरील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली. लक्ष्मी रोड-संत कबीर चौक ते अलका चौक, केळकर रोड-फुटका बुरूज ते अलका चौक, कुमठेकर रोड – शनिपार ते अलका चौक, बाजीराव रोड – पुरम चौक ते गाडगीळ पुतळा. टिळक रोड – जेधे चौक ते अलका चौक, शास्त्री रोड – सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक, कर्वे रोड – नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड – खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक, जंगली महाराज रोड – स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक, शिवाजी रोड – गाडगीळ पुतळा ते जेथे चौक या मार्गावर अवजड वाहनांना 24 तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

अशी आहे वाहतूक व्यवस्था

शिवाजी रस्त्यावर गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. वाहन चालकांनी पर्‍यायी मार्गाचा अवलंब करावा. गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळण घेऊन संताजी घोरपडे पथावरुन कुभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. शिवाजीनगरकडून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणार्या वाहनचालकानी स. गो. बर्वे चौकातून वळण न घेता सरळ जंगजी महाराज रोडने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक मार्गे टिळक रोडने जावे. डावीकडे झाशीची राणी चौक ते खुडे चौक ते डेंगळे पूल मार्गे कुंभारवेसकडे जाणार्या वाहन चालकांनी खुडे चौकामधून म.न.पा. पुणे समोरून मंगला सिनेमा लेन मधून कुंभारवेस किंवा प्रिमीयर गॅरेज चौक शिवाजी पूल मार्गे गाडगीळ पुतळा चौकात डावीकडे वळण घेऊन कुंभारवेस चौक या पर्‍यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पार्किंग व्यवस्था अशी आहे

1. मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझापर्यंत
2. जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक रस्त्याच्या डाव्या बाजूस
3. नीलायम ब्रिज ते सिंहगड रोड जंक्शन

एकेरी वाहतूक सुरू असलेले रस्ते

1. फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज
2. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक
3. सोन्या मारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक
4. मंगला टॉकीजसमोरील प्रीमिअर गॅरेज लेनमधून कुंभारवेस

SCROLL FOR NEXT