heavy rainfall alert for 8 districts
पुणे: परतीच्या मान्सूनने महाराष्ट्राला जेरीस आणले असून, त्याचा मुक्काम वाढला आहे. आता 26 व 27 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने कोल्हापूर, पुणे, सातारा घाटमाथ्यासह मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
गत चोवीस तासांत राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीने तडाखा दिला आहे. प्रामख्याने मराठवाड्यात पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर 26 व 27 रोजीचा इशारा महत्त्वाचा आहे. 23 व 24 रोजी राज्यातील बहुतांश भागांत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. (Latest Pune News)
असे आहेत इशारे..... (तारखा)
ऑरेंज अलर्ट : मुंबई (27), पुणे, सातारा घाट (27), कोल्हापूर घाट (26, 27), रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव (27).