Monsoon alert Maharashtra
पुणे: बंगालच्या उपसागरात मंगळवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला, तर अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात मान्सून जोरदार सक्रिय झाला आहे. राज्यात आज बुधवार (दि. 27 ऑगस्ट) ते सोमवार (दि. 1 सप्टेंबर) पर्यंत मुसळधारेचा अंदाज देण्यात आला आहे.
ऐन गणेशोत्सवात मान्सून जोरदार सक्रिय होत आहे. गत दोन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस सुरू होता. आता वेग वाढल्याने राज्यातील 80 टक्के जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 27 व 28 ऑगस्ट रोजी सातारा तर 28 रोजी कोल्हापूर घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Latest Pune News)
समुद्रात जाण्यास मच्छीमारांना मज्जार्वीं जम्मू काश्मीरपासून पूर्वोत्तर भारताचा भाग, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि दक्षिण भारतात मान्सूनचा जोर वाढला असून, किनारपट्टीच्या भागांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात मच्छीमारांना जाण्यास मज्जाव करण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.