Monsoon 2025 Orange Alert Pune
पुणे : पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी (दि.15) रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस लोणावळामध्ये 123 मि.मी.ची नोंद झाली. सोमवारी (दि.16) दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. दरम्यान, आगामी 48 तास जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
रविवारी रात्री अरबी समुद्राकडून जोरदार वारे राज्यात आल्याने थांबलेला मान्सून सक्रिय झाला. त्यामुळे रविवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. पुणे शहरात रात्रभर पाऊस झाला. जिल्ह्यातही बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. लोणावळामध्ये अतिवृष्टी झाली. या हंगामातील सर्वात मोठा 123 मि. मी. पाऊस एका रात्रीत तेथे झाला. तसेच, गिरीवन 84, भोर 80 मि. मी. पाऊस झाला.
लोणावळा 123, गिरीवन 84, भोर 80, एनडीए 46.5, लवळे 44, पाषाण 42.5, तळेगाव 32.5, शिवाजीनगर 30.5, चिंचवड 28, मगरपट्टा 27.5, डुडुगळगाव 26.5, हडपसर 25, हवेली 20.5, तळेगाव ढमढेरे 19.5, राजगुरुनगर 16, माळीण 13.5, निमगिरी 12, पुरंदर 8.5, दापोडी 8.5, नारायणगाव 4.5, बारामती 2.5.
कुरवंडे 46.5, लवासा 34.5, माळीण 26, भोर 24, निमगिरी 22, गिरीवन 19.5, लवळे 12, तळेगाव 9.5, चिंचवड 9, एनडीए 8, पाषाण 6.8, डुडुळगाव 6, शिवाजीनगर 5.9, नारायणगाव 4, राजगुरुनगर 3, मगरपट्टा 3, हडपसर 2, हवेली 2, तळेगाव ढमढेरे 1, पुरंदर 0.5, बारामती 0.4.