Monsoon rain in pune city
पुणेः यंदाच्या उन्हाळी हंगामात शहरात प्रथमच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पुणेकर सुखावले. गेले दोन महिने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना उन्हाळ्यात गारवा अनुभवयाला मिळाला. शुक्रवारी दुपारी 3 ते 4.30 पर्यंत पावसाने शहराला मनसोक्त भिजवले. त्यामुळे रस्त्यांना पूर आला,अनेक ठिकाणी सखल भागात डबकी तयार झाली होती. शहराचा पारा 34 वरुन 32 अंशावर खाली आल्याने भर दुपारी शहर गार झाले होते.
यंदा शहरात उन्हाळी हंगातमात फक्त 7 मी.मी पावसाची नोंद झाली.तो देखिल मार्च महिन्यात एकदाच पडला त्यानंतर मात्र शहरात तब्लल 60 दिवस तीव्र उकाड्याची लाटच सक्रीय होती.दुपारी 1 ते 5 पर्यंत बाहेर पडणे कठीण झाले होते.अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा अनुभवला. दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातवरण तयार झाले मात्र पाऊस पडत नव्हता.
अखेर 9 मे रोजी शुक्रवारी दुपारी 3 वाजता आकाशात पांढरे शुभ्र ढग दाटून आले.त्यानंतर काळ्या ढगांची गर्दी त्यापेक्षा जास्त वाढली.दुपारी 3 ते 4.30 असा दिड तास पाऊस सुरु होता.शहराच्या सर्वंच भागात पावसाने हजेरी लावली.विजांचा कडकडाट नव्हता.वाराही जोराचा नव्हता त्यामुळे झाडपडीच्या मोठ्या घटना झाल्या नाही मात्र पावसामुळे चिखल झाल्याने शहरातील अनेक भागात लोक दुचाकीवरुन घसरुन पडले.
शहरातील सर्वपेठा आणि उपनगरांत पावसाने हजेरी लावली.त्यामुळे रस्त्यांना पूर आला सखल भागात पाणी साचले,पर्वंती,सिंहगड रस्ता,शिवाजीनगर,हडपसर,पाषाण, कोरेगावपार्क, या भागात पावसाचा जोर जास्त होता.त्यामुळे या ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते.
बालभारती ते भांडारकर संस्था या रस्त्यावरुन उतार असल्याने पाणी खूप जोराने वाहत आले.त्यामुळे भांडारकर संस्थे समोर मोठे तळे तयार झाले होते.त्यातून वाट काढताना वाहनधारकांची तारांबळ उडाली.सूस,बाणेर,पाषाण या परिसरातही पावसाने वाहने खोळंबली होती.
हडपसर ः 17.5, शिवाजीनगर 11.2, पाषाण 17, कोरेगावपार्क6 चिंचवड 1.5, मगरपट्टा 1. वडगावशेरी 0.5,