Mumbai Pune Heavy Rain Forecast X-Band Radar Activated
पुणे : मुंबई, पुणे शहरात होणाऱ्या अतिवृष्टीचा अंदाज येण्यास अनेक अडचणी होत्या. त्या यंदाच्या मान्सून हंगामापासून कमी होतील, अशी आशा आहे. कारण सप्टेंबर 2024 मध्ये मुंबईतील पनवेल, वसई-विरार, विलेपार्ले आणि कल्याण-डोंबिवली या भागात चार एक्स बॅन्ड रडार बसविल्याने ही सोय झाली आहे. मुंबई जलमय होण्याच्या किमान पाच ते सहा तास आधी हा अंदाज मिळणार आहे. हेच रडर काही प्रमाणात पुणे आणि कोकणातील काही भाग कव्हर करणार आहे.
पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) मुंबईत एक्स-बँड रडारचे नेटवर्क स्थापित केले आहे. सप्टेंबर 2024 मध्ये बसवलेल्या रडार नेटवर्कची ट्रायल मागच्या वर्षी घेण्यात आली. मात्र, तोवर पावसाळी हंगाम संपलेला होता. मुंबईतील 138 स्टेशनवरचा पाऊस हे रडार यंदा मात्र पहिल्या पावसापासून देण्यास सज्ज आहेत. त्याचा फायदा पुणे शहरासह कोकण विभागाला काही प्रमाणात होईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
मुंबईतील रिअल-टाइम हवामान निरीक्षण वाढवण्याच्या उद्देशाने पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने मुंबईत भारतातील पहिले शहरी रडार नेटवर्क स्थापित केले आहे. ज्यामध्ये चार एक्स-बँड ध्रुवीय रडारचे नेटवर्क सज्ज केले आहे. हे नेटवर्क यंदाच्या मान्सून हंगामाची बारीक निरिक्षणे पाच ते सहा तास आधिच देण्यास सज्ज आहे.
पनवेल, वसई-विरार, विलेपार्ले आणि कल्याण-डोंबिवली येथे हे चार एक्स बँन्ड रडार बसवले आहेत. जे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाचे व्यापक कव्हरेज प्रदान करेल.
प्रत्येक रडारमधील डेटा मध्ये एकत्रित केला जाईल, जो संपूर्ण मुंबईतील हवामान प्रणालींचा रिअल-टाइम ट्रॅकिंग प्रदान करेल. मुंबईच्या हवामान पद्धतींचा संपूर्ण आणि सततचे रिडिंग प्रदान करेल. हे नेटवर्क प्रदेशात पावसाचे निरीक्षण आणि नॉवकास्टिंग क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करेल.
पारंपरिक हवामान रडारमध्ये साधारणपणे एस-बँड रडार असतो. ज्या अँटेनाचा आकार सुमारे 8 मीटर व्यासाचा असतो. दुसरा प्रकार म्हणजे सी-बँड रडार ज्याचा अँटेना 4 मीटर व्यासाचा असतो. हे रडार कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळे यासारख्या मोठ्या प्रमाणात हवामान पद्धतींचे निरीक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले असतात. त्यांना मोठ्या पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. मुंबईसारख्या शहरात उंच इमारती रडार सिग्नल देखील ब्लॉक करू शकतात. ज्यामुळे जमिनीजवळील हवामान घटना शोधण्यात रडारची प्रभावीता कमी होते.
मुंबईतील उंच इमारतींना पर्याय म्हणून 1 मीटर व्यास असलेले चार एक्स-बँड रडार सप्टेंबर 2024 मध्ये कार्यान्वित करण्यात आले. उच्च रिझोल्यूशनसह लहान क्षेत्रे कव्हर करण्यासाठी आणि पृष्ठभागाच्या जवळ मोजमाप प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. यामुळे ते स्थानिक हवामान घटनांचे निरीक्षण करण्यासाठी अधिक प्रभावी ठरतात.
- नेटवर्कमधील चारही रडारपैकी प्रत्येकाची रेंज 60 कि.मी आहे.जी एकत्रितपणे सुमारे 50 हजार चौरस कि.मी इतके क्षेत्र कव्हर करेल.
- या रडारद्वारे तयार केलेला हवामान डेटा पाच मिनिटांपेक्षा कमी अंतराने, 50 मीटर रिझोल्यूशनसह दिला जाईल.
- उच्च-रिझोल्यूशन डेटा नॉकास्टिंग क्षमता वाढवेल. ज्यामुळे स्थानिक हवामान घटनांचे रिअल-टाइम निरीक्षण आणि अंदाज करणे शक्य होईल.
-आयआयटीएम आणि आयएमडी कडून एकत्रित रडार निरीक्षणे रिअलटाइम, उच्च-रिझोल्यूशन पर्जन्यमान नकाशे प्रदान करतील.ज्यामुळे पावसाच्या नॉकास्टिंगमध्ये लक्षणीय सुधारणा होईल.असा दावा हवामान तज्ज्ञांनी केला आहे.
प्रामुख्याने मुंबईतील 139 स्टेशन या रडारमुळे कव्हर होणार आहेत. याची रेंज 2 ते 120 कि.मी. इतकी आहे. त्यामुळे या द्वारे पुणे आणि काही प्रमाणात कोकण परिसरातील अंदाजही हे रडार देऊ शकणार आहे. यात मुसळधार पाऊस, वादळ, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टीचे लहान स्फोट. ज्यामुळे बहुतेकदा शहरात पूर येतो. ते समजण्यास मदत होईल.- डॉ.हरिकृष्णन देवशेट्टी, संशोधक, आयआयटीएम, पुणे