Heavy rain alert issued in Maharashtra for next three days
पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागाला शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत 12 ते 14 सप्टेंबर या कालावधीत ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
राज्यात मान्सून सक्रिय होत असून, गुरुवारपासून त्याची सुरुवात काही भागांत झाली. शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधारेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Latest Pune News)
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने संपूर्ण देशात पाऊस वाढला आहे. महाराष्ट्रात विदर्भ वगळता सर्वत्र अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात मध्यम ते मुसळधार म्हणजे ‘यलो अलर्ट’चा इशारा दिला आहे.