पुणे: शहर, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून, सोमवारी (दि. 7) कोरेगाव पार्कचा पारा 41.1, त्यापाठोपाठ शिरूरचा पारा 40.9 अंशांवर गेला होता. सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत जिल्ह्यात सर्वत्र उष्णतेच्या झळा जाणवल्या.
चारच दिवसांपूर्व पावसामुळे कमाल तापमानात चार अंशांनी घट झाली अन् पारा 40 वरून 36 अंशांपर्यंत खाली आला होता. मात्र, सोमवारी शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागांचे तापमान 40 ते 41 अंशांवर गेले होते. त्यामुळे दिवसभर उष्णतेच्या झळा चांगल्याच जाणवत होत्या. दुपारी 1 ते 4 पर्यंत रस्त्यांवरील रहदारी किंचितशी कमी झाली होती.
सोमवारचे कमाल तापमान (संपूर्ण जिल्हा)
कोरेगाव पार्क 41.1, शिरूर 40.9, राजगुरुनगर 40.8, तळेगाव ढमढेरे 40.7, पाषाण 40.7, शिवाजीनगर 40.2, हडपसर 40.1, चिंचवड 39.7, मगरपट्टा 39.6, बारामती 39.6, बालेवाडी 39.6, वडगाव शेरी 39.3, गिरीवन 39.3, पुरंदर 39.2, एनडीए 39, इंदापूर 38.8, आंबेगाव 38.8, लवळे 38.3, दापोडी 38.2, माळीण 38.2.