पुणे : घनकचरा व्यवस्थापन आरोग्य विभाग येथे बिगारी मुकादम म्हणून काम करणार्या कर्मचार्याची बदली न करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आरोग्य निरीक्षकावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सचिन धर्मा गवळी (वय 34, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय) असे आरोग्य निरीक्षकाचे नाव असून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी 55 वर्षीय कर्मचार्याने तक्रार दिली. तक्रारदार हे बिगारी मुकादम म्हणून घनकचरा व्यवस्थापन आरोग्य विभाग नगररोड-वडगाव शेरी येथील कार्यालयात काम करतात.
त्यांची तेथून बदली न करण्यासाठी गवळी याने 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे 27 ऑक्टोबर 2022 रोजी तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केली असता गवळी याने स्वतःसाठी व वरिष्ठांसाठी लाचेची मागणी केल्याचे समोर आले. त्यानुसार लाचलुचपत विभागाने तक्रार दाखल करून त्याला अटक केली आहे.पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करीत आहे..