पुणे

पिंपरी : व्यावसायिकाला पावणेतीन लाखांचा गंडा

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : विवाह जुळवणार्‍या वेबसाईटवरील दोन महिलांनी एका व्यावसायिकाला पावणेतीन लाखांचा गंडा घातला. ही घटना 9 जून ते 23 जुलै या कालावधीत प्राधिकरण, निगडी येथे घडली. रणजित पुरुषोत्तम इंगळे (44, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 15) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची विवाह जुळवणार्‍या संकेतस्थळावरील आरोपी महिलांशी ओळख झाली. त्यानंतर एका महिलेने त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखवले.  दरम्यान, आरोपी महिलेने आपल्याला आईच्या उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगून फिर्यादी यांच्याकडून बँक खात्यावर आणि गुगल पेद्वारे एकूण दोन लाख 65 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT