Maharashtra Wrestling Council | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी हनुमंत गावडे तर ललित लांडगे सरचिटणीस  Pudhari Photo
पुणे

Maharashtra Wrestling Council | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी हनुमंत गावडे तर ललित लांडगे सरचिटणीस

निवडणूक बिनविरोध पार

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 2025 ते 2029 या कार्यकालासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून, अध्यक्षपदी हनुमंत बाळासाहेब गावडे तर सरचिटणीसपदी ललित बाळासाहेब लांडगे यांची निवड करण्यात आली आहे.

ही निवडणूक प्रक्रिया 14 ते 16 जुलैदरम्यान कात्रज येथील स्व. मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात पार पडली. निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण कामकाज निवृत्त न्यायाधीश शिवाजी मधुकर बेलकर यांच्या देखरेखीखाली पार पडले.

नवीन कार्यकारिणीची यादी पुढीलप्रमाणे :

  • अध्यक्ष : हनुमंत बाळासाहेब गावडे

  • कार्याध्यक्ष : दयानंदजी रामचंद्रजी भक्त

  • उपाध्यक्ष : भगतसिंग भुजगसिंग गाडीवाले, भरत किसन मेकाले, मुरलीधर विठ्ठलराव टेकुलवार, ज्ञानदेव रामचंद्र जाधव, अशोक ज्योतीराम माने, उमेश विश्वनाथ चौधरी

  • सरचिटणीस : ललित बाळासाहेब लांडगे

  • खजिनदार : अमृता पांडुरंग भोसले

  • विभागीय चिटणीस : सुनील बबनराव देशमुख, काबुलीवाले श्याम देवीचंदजी, प्रल्हाद गंगाराम आळणे, रंगराव बंडू पाटील

  • कार्यकारिणी सदस्य : सुनील बुधाजी चौधरी, राणू मारुती दोरकर, चंद्रशेखर मारोतराव पडगेलवार, दिलीपसिंग भुजंगसिंग गाडीवाले, नवनाथ गुलाब घुले, ज्ञानेश्वर रघुनाथ मांगडे, मंगलसिंग विजयसिंग पवार, बजरंग किसन मेकाले, गोरखनाथ सोमनाथ भिकुले, सतीश विठ्ठलराव वानखेडे

निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे कुस्तीगीर परिषदेच्या नव्या नेतृत्वाकडून आगामी काळात कुस्तीच्या विकासासाठी प्रभावी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT