हगवणे मायलेकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी FiIle Photo
पुणे

Vaishnavi Hagwane Case: जेसीबी व्यवहार फसवणूक प्रकरणी हगवणे मायलेकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी

राजगुरुनगर येथील प्रथम वर्ग न्यादंडाधिकारी जे. बी. म्हस्के यांनी मंगळवारी (दि ३)तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

पुढारी वृत्तसेवा

खेड: जेसीबी व्यवहारात फसवणूक केल्यावरून मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी तिची सासू आणि नवरा या हगवणे मायलेकाला राजगुरुनगर येथील प्रथम वर्ग न्यादंडाधिकारी जे. बी. म्हस्के यांनी मंगळवारी (दि ३)तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

खरेदीची मूळ कागदपत्रे आरोपींकडे आहेत, व्यवहार पूर्ण झाल्यावर ते नंतर देऊ असं ते वारंवार म्हणत आलेत. त्यामुळं आम्ही ते आत्ताच सादर करु शकत नाही. त्याचाच शोध घ्यायचा आहे, असे सरकारी वकीलांनी सांगितले तर तपास अधिकारी म्हणाले मे २०२४ च्या तक्रारीनंतर आरोपी हगवणे याने जबाब दिला होता. यामध्ये हा जेसीबी विक्री केल्याचं त्याने स्वतःच कबुल केलं आहे. हा जबाब मी न्यायायला पुढं सादर करत आहे. (Pune News Update)

हगवणेचे वकील म्हणाले, जेसीबी अथवा इतर मशिनरी भाडे तत्वावर दिली जाते. त्याप्रमाणे हे जेसीबी भाडे तत्वावर दिले होते. उलट त्यांनी अपुरे भाडे दिले. जर त्यांनी जेसीबी खरेदी केला असेल तर करारनामा कुठं आहे? किमान फोटो कॉपी तरी हवी होती? आता कोणती तरी कागदपत्रे सादर करुन हगवणे यांना फासवण्याचा प्रयत्न होत आहे.

हगवणेंचे वकील युक्तिवाद करताना म्हणाले की, हगवणे बंदूक परवानाधारक आहे, हे माध्यमांमध्ये आलेलं आहे. उलट ५ ते १० लाख रुपये प्रशांत येळवंडे यांच्याकडून येणं बाकी आहे. हे फक्त षडयंत्र आहे, हगवणे कुटुंबाला जास्तीतजास्त तुरुंगात ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. बँकेचा जो एजंट आहे, त्याच्याकडे स्वतंत्र चौकशी करता येऊ शकते. यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. हगवणे माय-लेकाला न्यायालय कोठडी द्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT