पुणे: हडपसर रेल्वे टर्मिनलचे काम 70 टक्के पूर्ण झाले असून, डिसेंबर 2025 पर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे हडपसर टर्मिनल पुणे शहराचे सॅटेलाईट टर्मिनल म्हणून विकसित होईल. त्यामुळे रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांमध्ये वाढ होईल. यासोबतच पुणे रेल्वे स्थानकावर दिवसेंदिवस वाढणारा ताण कमी होणार आहे.
हडपसर टर्मिनलवर या सुविधा...
हडपसर रेल्वे स्थानकाचा सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकास करणे, यात नवीन अतिरिक्त लूप लाईन्सची तरतूद आहे.नवीन स्टेशन इमारत 21 मीटर आणि 14 मीटर रुंद आहे. दोन नवीन प्रवेशद्वाराची तरतूद आहे आणि नवीन मुख्य प्रवेशद्वार इमारतीच्या आकर्षक थीमवर आधारित आहे. (Latest Pune News)
नवीन बुकिंग ऑफिस, एटीव्हीएम मशिन, फर्स्ट आणि सेकंड क्लास वेटिंग रूम, व्हीआयपी लाउंज फूड प्लाझा आणि कॅफेटेरिया, क्लॉक रूम, रिटायरिंग रूम कुली रूम, पार्सल ऑफिस, चाइल्ड केअर रूम नवीन सुधारित टॉयलेट ब्लॉक्स आणि वॉटर बूथ
जमिनीखालील आणि ओव्हरहेड पाण्याच्या टाकीची तरतूद
संपूर्ण कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्मची तरतूद नवीन फर्निचरच्या तरतुदीसह प्लॅटफॉर्म आणि वेटिंग रूममध्ये आसन क्षमता वाढवणे. रूफ प्लाझा आणि 2 एस्केलेटरसह 12 मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिजची तरतूद बहुमजली पार्किंगच्या तरतुदीसह संरक्षित पार्किंगचा विकास रस्ता रुंदीकरण, लँडस्केपिंग, पादचारी मार्गांसह परिभ्रमण क्षेत्राचा विकास दिव्यांगजन फ्रेंडली टॉयलेट आणि वॉटर बूथ बुकिंग काउंटर तसेच रॅम्प आणि स्वतंत्र पार्किंग नवीन 12 मीटर रुंद एफओबी (फुट ओव्हर ब्रिज) रॅम्प ट्रेन माहिती प्रणालीची तरतूद प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जीआरपी, आरपीएफ कार्यालय.
पीएमपीची फीडर सेवा उपलब्ध करा
हडपसर रेल्वे टर्मिनल येथील प्रवाशांसाठी पीएमपीची सार्वजनिक सेवाच उपलब्ध नाही. परिणामी, प्रवाशांना सामानाच्या बॅगांसह दीड ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. त्यातच रिक्षाचालकांकडून प्रवाशांची अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी केली जात आहे. या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
हडपसर रेल्वे टर्मिनलचे काम 70 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित 30 टक्के काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येत आहे. आत्तापर्यंत येथे चार नव्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. स्थानकावर प्रवाशांसाठी असलेले प्रतीक्षालय, व्हीआयपी लाऊंजची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय आरपीएफ कार्यालय, तिकीट निरीक्षक कक्ष आणि नियंत्रण कक्षाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, येथे रेल्वे गाड्या पार्क/पास करण्यासाठी अतिरिक्त मार्गिका (स्टेबलिंग लाईन) तयार करण्याचे काम सुरू आहे. तांत्रिक कामे देखील सुरू आहेत. याव्यतिरिक्त प्रवाशांसाठी फुट ओव्हरब्रिज (एफओबी) उभारण्याच्या कामाला देखील लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.- हेमंत कुमार बेहेरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग