‘ज्ञानराधा को. ऑप’च्या संचालिका अर्चना कुटेसह दोघींना बेड्या pudhari
पुणे

Gyanradha Credit Society Scam: ‘ज्ञानराधा को. ऑप’च्या संचालिका अर्चना कुटेसह दोघींना बेड्या

बाणेर परिसरात सीआयडीची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुणे : बीड, जालना, तसेच छत्रपती संभाजीनगरमधील ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात गेले दीड वर्ष फरार असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या फरार संचालिका अर्चना सुरेश कुटे, आशा पद्माकर पाटोदेकर (पाटील) यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीआयडी) पुण्यातून बेड्या ठोकल्या. बाणेर परिसरात ही कारवाई करण्यात आली. (latest Pune News)

बीड, जालना, तसेच छत्रपती संभाजीनगरमधील ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास छत्रपती संभाजीनगर येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात संचालक मंडळाविरुद्ध 95 गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे दाखल झाल्यानंतर संचालिका अर्चना कुटे, आशा पाटोदेकर या पसार झाल्या होत्या. गेले दीड वर्ष त्या पसार होत्या. त्यांच्या मागावर सीआयडीचे पथक होते. कुटे आणि पाटोदेकर या बाणेर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआयडीच्या पथकाने त्यांना अटक केली. अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद, पोलिस उपमहानिरीक्षक अमोल गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक किरण पाटील, पोलिस उपअधीक्षक स्वाती थोरात, पोलिस निरीक्षक विजय पणदे, कारभारी गाडेकर, देवचंद घुणावत, सय्यद रफीक यांनी ही कारवाई केली.

दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

अर्चना कुटे हिच्याकडून 80 लाख 90 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, 56 लाख 75 हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तू, दागिने, 63 लाखांची रोकड, दहा लाखांचे वाहन असा दोन कोटी दहा लाख 75 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात 13 संचालकांपैकी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT