पुणे: पुण्यात खून, दरोडा, मारामारी, खंडणी सारखे गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ हा सध्या विदेशात असून त्यांचे लोकेशन लंडन आहे असे बोलले जात असताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तो सध्या स्विर्त्झंलंड मध्ये असल्याचे स्पष्ठ केले आहे. नुकताच निलेश घायवळसह त्याच्या टोळीवर कोथरूड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली.
एका तरूणावर गोळीबार करून लगेच दहा मिनिटात दुसर्या तरूणावर धारदार हत्याराने वार करून घायवळच्या टोळीतील सदस्यांनी दोन आठवड्यापूर्वी दोन तरूणांवर वार केले होते. याप्रकरणी त्यातील काही आरोपींना अटक करताना त्यांच्यासह इतरांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Latest Pune News)
दरम्यान गुन्ह्याच्या अनुषंगाने निलेश घायवळची माहिती घेतल्यानंतर तो पुण्यात व अहिल्यानगर परिसरात नसल्याचे निष्पन्न झाले होते. प्रत्यक्षात त्यांची माहिती घेतल्यानंतर त्याचे लोकश सध्या स्विर्त्झंलंड येथे असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान घायवळला देण्यात आलेलर्ट बद्दलही पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.
दरम्यान त्याला पासपोर्ट आहिल्यानगर येथील आयुक्तालयातून देण्यात आला आहे. त्याला मिळालेला पासपोर्ट आणि व्हीसा गुन्हेगारी रेकॉर्ड असताना कसा मिळाला असा प्रश्नही या निमित्ताने होत असून पुणे पोलिसांनी याबाबतची चौकशी सुरू केली आहे. त्याने, पासपोर्ट कधी, केव्हा, कसा मिळवला त्या दृष्टीनेही पुणे पोलिस चौकशी करत असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.