पुणे: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील फुल बाजारात सर्व फुलांची आवक वाढली आहे. रथसप्तमी आणि प्रजासत्ताक दिनामुळे फुलांना मागणीही चांगली आहे. परिणामी गत आठवड्याच्या तुलनेत दरात दहा ते वीस टक्क्यानी वाढ झाली असल्याची माहिती फुलव्यापारी सागर भोसले यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे:
झेंडू : 20-60, गुलछडी : 150-200, ॲष्टर : जुडी 30-50, सुट्टा 100-150, कापरी : 60-100, शेवंती : 60-120, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : 30-60, गुलछडी काडी : 50-150, डच गुलाब (20 नग) : 150-300, जर्बेरा : 40-60.
कार्नेशियन : 150-250, शेवंती काडी 150-300, लिलियम (10 काड्या) 800-1000, ऑर्चिड 400-500, ग्लॅडिओ (10 काड्या) : 80-120, जिप्सोफिला : 250-350, लीली बंडल : 14-20.