पुणे : पुढारी वृत्तसेवा : नववर्षाच्या निमित्ताने अनेक मोठी कामे आम्हाला करायची आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याण संकल्पाप्रमाणेच आम्हीदेखील गरीब कल्याणाचा संकल्प हाती घेत आहोत, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. संस्कृती प्रतिष्ठान आणि हिंदुत्व दिन सोहळा समितीच्या वतीने कोथरूड परिसरात बुधवारी (दि. 22) गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त जंगी मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'गुढीपाडव्यानिमित्त अनेक कामे करण्याचा आमचा संकल्प आहे. त्या संकल्पानुसार राज्यातील एकही मुलगी शिक्षणाविना राहणार नाही, यासाठी आम्ही संकल्प करणार आहोत. मुलींचे शिक्षण हे झालेच पाहिजे, त्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जातील.'
'आनंदाचा शिधा' हा उपक्रम दिवाळीनंतर आता पुन्हा राबविण्यात आला. त्याकरिता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी भरपूर प्रयत्न केले. दिवाळीप्रमाणेच आत्ताही हा उपक्रम यशस्वी झाला आहे, असे ते म्हणाले
सभेच्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर व्हावे…
गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी मुंबईत सभा घेतली आहे. ठाकरे यांच्या सभेला नेहमीच प्रचंड गर्दी असते. याबाबत पत्रकारांनी चंत्रकांत पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले, 'सभेला गर्दी असणे चांगली गोष्ट आहे. त्यांच्या मतांचे, विचारांचे फोलोअर्स जास्त आहेत. मात्र, त्या सभेच्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होणे आवश्यक आ