पुणे: यंदाचा मान्सून हंगाम देशाला चांगल्या पावसाचा राहिला. देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांपैकी तब्बल २१ राज्यांनी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील पावसाची सरासरी पार केली.
देशात सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. दोन राज्यात अतिवृष्टी आणि नऊ राज्यात मुसळधारेची नोंद झाली आहे. मात्र अरुणाचल, आसाम, मेघालय, बिहार या चार राज्यात कमी पाऊस झाला आहे. २१ राज्यांनी सरासरी गाठली. (Latest Pune News)
यंदाचा मान्सून हंगाम मंगळवारी ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. जून ते सप्टेंबर २०२५ या चार माहिन्याचा हंगाम संपूर्ण देशासाठी चांगला रहिला. अनेक भागात अतिवृष्टीने हाहाकार निर्माण केला असला तरीही देशाच्या ५२ टक्के भागात म्हणजे २१ राज्यांत सरासरी इतका पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस राजस्थान (७१ % ) आणि हिमाचल प्रदेशात (४०%) झाला आहे. मात्र अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि बिहार या चार राज्यात मात्र कमी पावसाची नोंद झाली. मात्र खूप कमी पाऊस (अवर्षणग्रस्त भाग) देशात यंदा कुठेही नाही.
- देशात सरासरी : ८ टक्के जास्त
( सरासरी : ८६१.२ मि.मी , पडला : ९३०.३ मि.मी )
- अतिवृष्टीची राज्ये (२ )
राजस्थान (७१ ), हिमाचल प्र. (४० )
- मुसळधारेची राज्ये : (९)
उत्तराखंड (22), हरियाणा (३४), दिल्ली (३६), पंजाब (४२), जम्मू-काश्मीर, लद्दाख (२९), मध्य प्रदेश (२१), गुजरात (१९), सौराष्ट्र-कच्छ (२४), दादरा, नगर, हवेली (२३),
सरासरी इतका आणि किंचित जास्त : (१३ भाग)
महाराष्ट्र (१९), गोवा (१३), अंदामान, निकोबार (१६), नागालॅन्ड (१९), त्रिपूरा (१), पं. बंगाल (२), ओडिशा (१), झारखंड (११), गुजरात (१९), छत्तीसगड (४), आंध्र प्रदेश (७), तमिळनाडू (२), कर्नाटक (९)
कमी पावसाची राज्ये (६) (सरासरीत काठावर पास)
लक्षद्वीप (उणे १६), केरळ (उणे १३), मणिपूर (उणे ११), मिझोराम (उणे १०), सिक्कीम (उणे ११), उत्तर प्रदेश (उणे १६)
-कमी पावसाची राज्ये (४)
अरुणाचल प्रदेश (उणे ४१), आसाम (उणे ३२), मेघालय (उणे ४२), बिहार (उणे ३०)