पुणे

पिंपरी : महिलेचा विनयभंग करून अंगठी चोरली

अमृता चौगुले

पिंपरी : एका महिलेचा तिच्या ओळखीच्या व्यक्तीने हात धरून तू माझ्याशी का बोलत नाही म्हणून विनयभंग करीत, हातातील सोन्याची अंगठी चोरून नेल्याची घटना गुरूवारी (16 रोजी) वायसीएम हॉस्पिटल येथील शनी मंदिराजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादीच्या ओळखीतील आरोपी जावेद जैनउद्दीन शेख (वय 23, रा. पांचळ कॉलनी निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर) याने फिर्यादी महिलेचा हात धरून 'तु माझ्याशी का बोलत नाही' असे म्हणत ओढून हातातील तीन ग्रॅम वजनाची चार हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी चोरली. त्यामुळे महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात (शनिवारी 18) रोजी रात्री सव्वाआठ वाजता फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंग व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.

SCROLL FOR NEXT