पुणे

पुणे : नारीशक्तीचा गौरव; संस्था-संघटनांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजविणार्‍या महिलांचा सन्मान… विविध वेशभूषा परिधान केलेल्या महिलांनी सादर केलेले नृत्य… व्याख्यानांसह चर्चासत्रात सहभागी झालेल्या महिला अन् महिलाशक्तीचा नारा बुलंद करीत बुधवारी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संस्था-संघटनांच्या वतीने आयोजित विविध उपक्रमातून नारीशक्तीला सलाम करण्यात आला अन् महिलांच्या कार्याचा गौरवही करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये महिलांनीही हिरीरीने सहभाग घेतला अन् 'हम किसीसे कम नहीं' हे दाखवून दिले.

महिला दिनाच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवादांसह विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले होते. रक्तदान शिबिरासह अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागातर्फे कष्टकरी महिलांचा सन्मान केला. विभागाच्या प्रदेशाध्यक्षा राधिका मखामले यांनी बिबवेवाडी येथील महिलांना सन्मानित केले. कल्पना उनावणे, प्रमिला भागवत, सुभद्रा धमगुंडे, आरती व्हावळ आदी उपस्थित होते.

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
आम्ही पुणेकर आणि साई सामाजिक सेवा संस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ संस्कृतज्ज्ञ पं. वसंतराव गाडगीळ, भारती रुग्णालयाच्या उपवैद्यकीय संचालक डॉ. अरुंधती पवार, आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव आदी उपस्थित होते. निर्मला माहेश्वरी, गीता राठी, अंजली तापडिया, सुनीता तिकोने, राधिका दळवी, स्मिता पवार, कविता डुकरे आदी महिलांचा गौरव करण्यात आला.

पुणे ग्रामीण टपाल विभागातील सर्व महिला कर्मचार्‍यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यामध्ये पाककला, संगीत खुर्ची आदी स्पर्धांसह डॉ. प्रज्ञा एरंडे यांचे 'दैनंदिन जीवनातील आहार' या विषयावर व्याख्यान झाले. रेखा भळघट, सुनीता घाणेकर, एस. डी. मोरे आदी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मैथिली झांजुर्णे यांचा शासकीय दिव्यांग कल्याण व पुनर्वसन समितीचे विशेष सदस्य रफीक खान यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

या वेळी पॅरा टार्गेट शूटिंगचे उपाध्यक्ष संतोष गाडे हे उपस्थित होते. उद्योगिनी समूहातर्फे उद्योगिनी प्राईड अ‍ॅवार्ड नुकताच झाला. माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी, संतोष कराळे, बाळासाहेब अमराळे, डॉ. इशा नानल , पल्लवी वागस्करआदी उपस्थित होते. भावना दौंड, रजनी दरेकर, डॉ. कीर्ती कुलकर्णी, सुनीता गाजरे, किरण प्रभुणे आदींना सन्मानित करण्यात आले.

या वेळी गीतांची मैफिल पार पडली. स्नेहल राक्षे व श्रेया गाजरे यांनी कार्यक्रम बहारदार नृत्ये केली. ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने बचत ते गुंतवणूक याविषयावर चार्टर्ड अकाऊंटंट सच्चीदानंद रानडे यांचे व्याख्यान महिलांसाठी आयोजिले होते. यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला. श्वेता कुलकर्णी, तृप्ती तारे, विद्या घटवाई, रूपाली जोशी आदी उपस्थित होते.

उल्लेखनीय कार्याबद्दल महिलांचा सन्मान

उपमहापौर आबा बागुल मित्रपरिवारातर्फे समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात आला. माजी उपमहापौर आबा बागुल, जयश्री बागुल, राजू घाटोळे, मनीषा निंबाळकर उपस्थित होते. सागर आरोळे, इम्तियाज तांबोळी, महेश ढवळे, संतोष पवार, अभिषेक बागुल यांनी आयोजन केले. फ्रायडे महिला कट्टाच्या वतीने माध्यम क्षेत्रातील महिला पत्रकारांचा सन्मान केला गेला. संगीता तिवारी, कमल व्यवहारे, राजलक्ष्मी भोसले, पल्लवी जावळे आदी उपस्थित होते.

कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठान आणि सार्थक ई-सेवा केंद्रातर्फे महिलांना विविध कामांसाठी शासकीय सेवा मोफत देण्यात आली. केंद्राच्या संचालिका सुवर्णा भरेकर यांनी महिलांना सहकार्य केले. विद्या भागवत, गौरी देसाई, स्वाती रवळे, रत्ना जगताप उपस्थित होते. शोषणमुक्ती दलाच्या वतीने वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात जनमत संघटिक करण्याकरिता शोषणविरोधी अभियान राबविण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गोखले, जीजा जगताप, स्वाती ठेंगडी आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. इंदिरा अस्वार, नंदिनी आवडे, स्नेहल भोसले, वृषाली शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ. ज्योती कुंभार यांनी आरोग्यासाठी आवश्यक व दैनंदिन जीवनात आहार कसा व कोणता घ्यावा या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीरामयोगाचे अध्यक्ष भानुदास पायगुडे आणि योगसाधकांच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. किशोरी शिंदे, प्रज्ञा पोतदार-पवार, श्वेता ढमढेरे, निकिता मोघे, माया प्रभुणे, लीना बोकील आदींना गौरविण्यात आले. विशाल तांबे, सुशांत ढमढेरे, अश्विनी भागवत, वर्षा तापकीर आदी उपस्थित होते.

कारागृह, सुधारसेवा विभागात आरोग्य तपासणी
पुणे शहरातील 'कारागृह व सुधारसेवा' विभागाकडून महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्याच्या कारागृह व सुधारसेवा विभागाच्या प्रभारी अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक स्वाती साठे यांच्या हस्ते झाले. ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती दासवानी उपस्थित होत्या. ससून रुग्णालयातील 7 विभागांतील 22 वैद्यकीय अधिकारी यांनी 100 महिलांची आरोग्य तपासणी केली. शिबिर आयोजनात दौलतराव जाधव, तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रमणी इंदुरकर, डॉ. हेमंतकुमार पवार, सुनेत्रा पाटील, डॉ. अंकिता सिन्हा यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT