पौड - पंधरा वर्षांत संग्राम थोपटेंनी निधी आणला. त्याच्या बेरीजपेक्षा जास्त निधी पाच वर्षांत देतो. त्यासाठी महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना एकदा संधी द्या, भोरचे सोने करतो, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
महायुती भोरचे उमेदवार शंकर मांडेकर यांचा प्रचारार्थ भोर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेला महायुतीतील पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती.
या वेळी माजी आमदार शरद ढमाले, रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, रेवननाथ दारवटकर, भगवान पासलकर, किरण राऊत, शंकर भुरुक, भालचंद्र जगताप, संतोष घोरपडे, मंगेश दरेकर, किरण राऊत, अंकुश मोरे, बाळासाहेब चांदेरे, राजाभाऊ हगवणे, सुनील चांदेरे, प्रमोद निम्हण, नितीनबापू थोपटे, श्रीकांत कदम, यशवंत डाळ, निर्मलाताई जागडे, कीर्ती देशमुख, पूनम विधाते, सारिका मांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
चार दिवस दोन तालुक्यांसाठी...
आमदारांनी सत्तेचा उपभोग घेतला. चांगलं नेतृत्व नसल्याने हा मतदारसंघ भकास झालाय. मी आठवड्यातील चार दिवस या दोन तालुक्यांसाठी देईल. फक्त एकदा कामाची संधी द्या, असे आवाहन शंकर मांडेकर यांनी केले.