पुणे

पिंपरी : तळेगाव येथे कचरा उचलणेस होत आहे दुर्लक्ष

अमृता चौगुले

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील स्टेशन भागात स्टेशन-अंबी रोडवर प्लॉट नं.६१, दूध डेअरी जवळ तपोधाम कॉलनी येथे ६-७ दिवसांपूर्वी तेथील गटारीतून गाळ, कचरा काढण्यात आला परंतु तो रस्त्यावर टाकण्यात आलेला आहे. अद्यापही तो कचरा, गाळ उचलणेत आलेला नसल्यामुळे रोडवर पसरत चाललेला आहे.

तसेच कचरा उन्हामुळे वाळून वा-याने उडत आहे. जाणा-या येणा-यांच्या डोळ्यात जात आहे. याबाबत अनेक वेळा संबंधितांच्या निदर्शनास आणले असतानाही दखल घेतली जात नाही. ही बाब नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. तसेच परिसरात दुर्गंधी,अस्वच्छता पसरत आहे.तरी कृपया याची दखल घेऊन वेळोवेळी कचरा उचलणे बाबत प्रशासनाने कार्यवाही करुन संबंधितांना सुचना द्याव्यात अशी मागणी होत आहे.

SCROLL FOR NEXT