पुणे : बाप्पांच्या आगमनामुळे महाराष्ट्रासह देशातील नागरिकांचा हॅपीनेस इंडेक्स टिपेला असून भरपूर पावसामुळे खरेदीचा उत्साह वाढला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात देशात तब्बल 45 हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचा अंदाज आहे. यात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 60 टक्के असेल, असा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने वर्तवला आहे. महाराष्ट्रामुळे संपूर्ण देशातील व्यापाराला बूस्ट मिळाला आहे.
यंदा मे महिन्यापासूनच देशभरात चांगल्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बाजारात चैतन्य निर्माण झाल्याने खरेदीला उधाण आले आहे. यात कपडे, सराफा, रिअल इस्टेट आणि वाहन बाजारसह गणेशोत्सवात इव्हेंट कंपन्यांची मोठी उलाढाल सुरू आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने गणेशोत्सव 2025 चा क्षेत्रनिहाय अहवाल अद्याप दिला नसला तरी अंदाज वर्तवला आहे. या गणेशोत्सवासाठी लक्षणीय आर्थिक वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
एकूण व्यवसाय : 45 हजार कोटी
कार्यक्रम व्यवस्थापन : 5 हजार कोटी
उत्सवाशी संबंधित व्यापार : 3 हजार
खाद्यपदार्थ : 3 हजार कोटी
मिठाई (मोदकसह) : 2 हजार कोटी
गणेशमूर्ती : 500 कोटी
मंडप खर्च : 10 हजार कोटी (महाराष्ट्रात)