मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन पार पडले की वेध लागतात इतर मंडळांच्या गणपती विसर्जनाला आता सुरुवात झाली आहे.
श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक आता सुरू झाली असून देखण्या रथातून बाप्पा परतीच्या प्रवासाला निघाले आहेत
श्री गणनायक रथातून श्रीमंत श्री दगडूशेठ गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली
रस्त्यावर मिरवणुकीचा आनंद घेणाऱ्या लोकांचा उत्साह दिसतो आहे
गजानन मंडळाच्या गरुड गणपतीची मिरवणूक सजवलेल्या शार्दूल रथातून निघाली आहे
शारदा गजानन गणपतीची देखणी मूर्ती जहाज रथातून परतीच्या प्रवासाला निघाली आहे
श्रीमंत भाऊ रंगारी बाप्पाचा सुरेख सजवलेल्या रथातून परतीचा प्रवास