पुणे

उद्या रंगणार ‘स्टार प्रवाहची महाराणी’ कार्यक्रमात धम्माल गेम शो

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मनोरंजक वन मिनिट गेम शो…. 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील कलाकारांना भेटण्याची संधी अन् कलाकारांसोबत मनसोक्त संवाद साधण्याचे निमित्त कस्तुरी सदस्यांना 'स्टार प्रवाहची महाराणी' या कार्यक्रमात साधता येणार आहे. 'पुढारी कस्तुरी क्लब' आयोजित आणि स्टार प्रवाह प्रस्तुत या रंगतदार कार्यक्रमात कस्तुरी सदस्यांसाठी धम्माल वन मिनिट गेम शो होणार असून, यातील अंतिम विजेत्यांना 'स्टार प्रवाहची महाराणी' किताब पटकावण्याची संधी मिळणार आहे. हा किताब पटकावणार्‍या महिलेस क्राऊन आणि आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे.

या कार्यक्रमात स्टार प्रवाहवरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतील मुख्य भूमिकेतील कलाकार आप्पू आणि शशांक यांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधीही कस्तुरींना मिळणार आहे. हा कार्यक्रम दुपारी साडेतीन वाजता आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होईल. 'पुढारी कस्तुरी क्लब'तर्फे नेहमीच कस्तुरी सदस्यांसाठी नावीन्यपूर्ण कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हा बहारदार कार्यक्रम कस्तुरींसाठी आयोजिला आहे. कस्तुरी सदस्यांना यानिमित्ताने वैविध्यपूर्ण वन मिनिट गेम शोमध्ये सहभागी होता येणार आहे. यानिमित्ताने कस्तुरी सदस्यांना या धम्माल गेम शोमध्ये सहभागी होण्याबरोबरच 'स्टार प्रवाहची महाराणी' हा किताबही जिंकता येणार आहे.

याशिवाय कलाकारांशी हितगुज करण्याचे निमित्तही साधता येईल. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठिपक्यांची रांगोळी' यातील मुख्य कलाकार आप्पू आणि शशांक हे कस्तुरींशी या मालिकेबद्दल दिलखुलास संवाद साधणार आहेत. तसेच, कस्तुरींसोबत 'स्टार प्रवाहची महाराणी' हा कार्यक्रमही एन्जॉय करणार आहेत. हा कार्यक्रम कस्तुरी सदस्यांसाठी खास ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT