फुरसुंगी: फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग््रेासने (अजित पवार गट) प्रचारात आघाडी घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेकराईनगरमध्ये झालेल्या सभेने उमेदवारांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार मोठ्या बहुमताने विजयी होऊन नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार, असा विश्वास येथील सर्व उमेदवारांनी प्रचार सभेदरम्यान व्यक्त केला आहे. या नगरपरिषदेसाठी शनिवारी (दि.20) मतदान होणार असून रविवारी (दि.21) मतमोजणी करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीतर्फे संतोष सरोदे हे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. इतर सोळा प्रभागांत राष्ट्रवादीचे उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत : प्रभाग 1 - गिरीश ढोरे, स्नेहा हरपळे, प्रभाग 2 - उषा ढोरे, सचिन हरपळे, प्रभाग 3 - स्नेहल जवंजाळ, सचिन देवकाते, प्रभाग 4 - संभाजी रोकडे, स्नेहल कामठे, प्रभाग 5 - स्वाती आढाळे, ओंकार कामठे, प्रभाग 6 - अमोल हरपळे, वंदना पुणेकर, प्रभाग 7 - निखिल सरोदे, कांचन हरपळे, प्रभाग 8 - पल्लवी हरपळे, प्रवीण हरपळे, प्रभाग 9 - गणेश ढोरे, उज्ज्वला गिरिगोसावी.
प्रभाग 10 - सुकन्या शेवाळे, अमित हरपळे, प्रभाग 11 - प्राची ढमाळ, अजिंक्य ढमाळ, प्रभाग 12 - अमोल कापरे, प्राची देशमुख, प्रभाग 13 - चंद्रकांत ढमाळ, भावना ढमाळ, प्रभाग 14 - शीतल हरपळे, दत्ता राऊत, प्रभाग 15 - प्रशांत भाडळे, सुषमा भाडळे, प्रभाग 16 - सनी शेवाळे, ज्योती आदमाने आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष होणार पिंपरी-चिंचवडप्रमाणे परिसराचा कायापालट फक्त राष्ट्रवादीच्याच माध्यमातून होऊ शकतो, असा विश्वास मतदारांना असल्याने त्यांच्याकडून आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचे (अजित पवार गट) सर्व उमेदवार बहुमताने निवडून येऊन नगराध्यक्षसुद्धा राष्ट्रवादीचाच होईल.गणेश ढोरे, माजी नगरसेवक, पुणे मनपा