पुणे : टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. याबाबत शनिवारी (दि. 4) एकाच दिवशी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या घटनेमध्ये कोथरूड परिसरात राहणार्या युवकाला टेलिग्रामवर संपर्क साधून वेगवेगळे टास्क देऊन त्यांना 8 लाख 35 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, परतावा न देता फसवणूक केली म्हणून कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दुसर्या घटनेत आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणार्या 31 वर्षीय युवकाने फिर्याद दिली. त्यानुसार व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून त्यांना पार्टटाइम नोकरीबाबत मेसेज आला. वेगवेगळे टास्क देत ते पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन विश्वास संपादन केला. यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार यांना 5 लाख 5 हजार रुपये भरण्यास भाग पडले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तिसर्या घटनेमध्ये नाना पेठ परिसरात राहणार्या 32 वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे. टास्क पूर्ण केल्यावर कमिशन देऊन तसेच गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला देऊ, असे सांगून विश्वासात घेतले. 2 लाख 84 हजारांची गुंतवणूक केल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा