पुणे

वडगाव मावळ : राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये साडेचार हजार प्रकरणे निकाली

अमृता चौगुले

वडगाव मावळ : वडगाव मावळ न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 4 हजार 641 प्रकरणे निकाली निघाली असून, 11 कोटी 82 लाख 38 हजार रुपयांची वसुली झाली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालयातून झालेल्या अदालतीचे उद्घाटन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांच्या हस्ते पार पडले. या वेळी वरिष्ठ दिवाणी न्यायधीश पी.जी देशमुख, दिवाणी व फौजदारी न्यायाधीश सी. आर. उमरेडकर, आर. एन. चव्हाण, ए. ए.स अगरवाल, एस. जे. कातकर, एस. आर. बर्गे आदी न्यायधीशांसह वडगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष मच्छिंद्र घोजगे उपस्थित होते.

6851 प्रकरणे दाखल
या अदालतीत 6 हजार 851 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली होती. त्यामध्ये न्यायालयात चालू असलेली प्रकरणे ही 1773 होती व दाखलपूर्व प्रकरणे 5078 होती. अनेक पक्षकारांनी सहकार्य केल्याने 165 प्रकरणे व दाखलपूर्व एकूण 4476 प्रकरणे निकाली निघाली. निकाली काढणार्‍या सर्व पक्षकारांचे स्वागत विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश सी. आर. उमरेडकर यांनी गुलाबपुष्प देऊन केले. सदर अदालतीत वकील चंद्रकांत रावळ, वाय. पी. गोरे, प्रताप शेलार, चेतन जाधव, सुधा शिंदे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले.

SCROLL FOR NEXT