Usha Kakade : माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांना आज (दि.८) दुपारी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी ४. २७ च्या सुमारास त्यांना गंभीर अवस्थेत खासगी वाहनातून त्यांच्या केअरटेकर व नोकरांनी रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले.