Assembly Election  file photo
पुणे

खेड-आळंदीत ट्विस्ट? माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषाताई विधानसभेच्या रिंगणात

मतदार संघाच्या राजकीय वर्तुळात रंगतदार चर्चांना उधाण आले आहे

पुढारी वृत्तसेवा

खेड-आळंदी विधानसभेत नवा राजकिय ट्विस्ट समोर आले आहे. तालुक्याचे माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे यांच्या उमेदवारीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या असून यामुळे मतदार संघाच्या राजकीय वर्तुळात रंगतदार चर्चांना उधाण आले आहे.

व्हायरल पोस्ट बरोबरच संभाव्य उमेदवार मनीषाताई गोरे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये लवकरच प्रवेश होणार असल्याची खात्री लायक माहिती समोर येत आहे. महविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेकडे डझन भर इच्छुक आहेत. त्यांच्यात उमेदवारी वरुन प्रचंड चुरस निर्माण झाली असताना शरद पवार यांनी या सर्वांना बाजुला सारुन ओबीसी प्रवर्गाच्या तेही महिला इच्छुक उमेदवाराला पुढे आणल्याने गेली काही महिने तयारी करणाऱ्या अनेकांच्या राजकीय विकेट पडल्या आहेत.

दुसरीकडे महायुतीच्या बाजूने लढणार असलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना शह बसण्याची शक्यता मानली जात आहे. महाविकास आघाडी कडे इच्छुक वाढल्याने बंडखोरीची शक्यता समोर येत होती. श्रीमती गोरे यांना उमेदवारी निश्चित झाल्यास ती शक्यता धुसर होणार असल्याचे बोलले जात आहे. एकास एक लढत झाली तर महाविकास आघाडीच्या पारड्यात यश पडणार आहे.

तिरंगी लढत झाल्यास आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पारडे जड राहणार असल्याचे संकेत मतदारां मधुन मिळत आहेत. दिवंगत आमदार सुरेश गोरे हे मुळ राष्ट्रवादीचे मात्र सन २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणुक लढवली, त्यात ते यशस्वी ठरले. पुढच्या म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. दोन्हीं निवडणुका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून लढवल्या होत्या. यावेळी त्यांच्या पत्नी मनीषाताई गोरे राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे बोलले जात आहे. कसेही असले तरी या घडामोडी द्वारे महा विकास आघाडीला खेड आळंदी विधानसभा मतदार संघात सर्व मान्य उमेदवार मिळाल्याचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT