पुणे

पुणे : कुर्‍हाड, कोयत्याने वार; माजी नगरसेवकाचा मृत्यू

अमृता चौगुले

जेजुरी (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : धालेवाडी गावाच्या हद्दीत नाझरे धरणाशेजारील शेतजमिनीच्या जुन्या वादातून जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबून सय्यदलाल पानसरे (वय 48) यांच्यासह तिघांवर पाच जणांनी कुर्‍हाड व कोयत्याने वार केले. यात माजी नगरसेवक मेहबूब पानसरे हे गंभीर जखमी झाले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. जेजुरी पोलिसांनी कुर्‍हाड व कोयत्याने मारहाण करणार्‍या वनेश प्रल्हाद परदेशी, किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी (रा. बेंदवस्ती, जेजुरी) व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची नाझरे धरण परिसरात शेती आहे .या शेतात ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत सुरू होती. मेहबूब पानसरे व त्यांचेबरोबर इतर तिघेजण हे शेतातील मशागतीचे काम पाहण्यासाठी गेले होते. वनेश परदेशी आणि मेहबूब पानसरे यांच्यात जमिनीच्या जुन्या वादाच्या कारणावरून या वेळी भांडण झाले. वनेश परदेशी, त्यांची दोन मुले तसेच इतर पाच जणांनी मेहबूब पानसरे व इतर दोघांवर कुर्‍हाड व कोयत्याने वार केले. यात तिघे जण जखमी झाले मेहबूब पानसरे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी भरडे, पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT