पुणे

पुणे : प्रदर्शन पाहून परदेशी पाहुणे भारावले

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र' या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस जोडून आयोजित शिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकासातील सर्वोत्तम पद्धती आदींचे सादरीकरण असलेल्या बहुमाध्यम प्रदर्शनाला 'जी-20' बैठकीला आलेल्या देश-विदेशातील प्रतिनिधींनी भेट दिली आणि प्रदर्शन पाहून परदेशी पाहुणेदेखील भारावले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित या प्रदर्शनात भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि उपक्रमात परदेशी प्रतिनिधींनी विशेष रुची दाखविली. भारतातील संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील प्रगतीचा जगातील इतर देशांना लाभ मिळत असल्याने या क्षेत्रात भारताकडून येणार्‍या काळात सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा या वेळी प्रतिनिधींनी व्यक्त केली.

युनिसेफ, ओईसीडी, स्पेन, बांगलादेश, चीन, इंडोनेशिया आणि युएईच्या प्रतिनिधींनी आयुका, एनसीईआरटी, सीबीएसई, गुवी, आयुका, आयसरच्या उपक्रमांची माहिती उत्सुकतेने घेतली. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नावीन्यपूर्ण शैक्षणिक साधनांबरोबरच भारतीय ज्ञानपरंपरेतील बाबींचा प्रदर्शनात समावेश आहे. 22 जूनपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT