पुणे

पुणे : बंद सदनिका चोरट्यांकडून टार्गेट; दोन घरफोड्यांत साडेपाच लाखांचा ऐवज चोरीला

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील वडगाव बुद्रुक व महंमदवाडी परिसरातील बंद सदनिकेवर डल्ला मारून चोरट्यांनी रोकड, सोन्या-चांदीचे दागिणे असा 5 लाख 69 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी सिंहगड रोड आणि कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव बुद्रुक येथील सुंदर पार्क डी बिल्डिंगमधील एका सदनिकेतून चोरट्यांनी रोकड, सोन्या-चांदीचे दागिणे असा 1 लाख 99 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना शुक्रवारी दुपारी बारा ते सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. तर दुसरी घरफोडीची घटना रहेजा विस्टा प्रीमियर टॉवर येथील एका सदनिकेत झाली आहे. येथून चोरट्यांनी 2 लाख 30 हजार रुपयांची रोकड, घड्याळ, सोन्याचे दागिणे असा 3 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या त्यांच्या मूळगावी अहमदाबाद येथे गेल्या होत्या. त्यामुळे त्यांची राहती सदनिका बंद होती. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सदनिकेच्या दरवाज्याचे लॅच उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर 3 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.

SCROLL FOR NEXT