लोणावळा : एकीकडे परतीचा पाऊस सुरू झाला असतानाच मागील काही दिवसांपासून पर्यटननगरी लोणावळा शहरामध्ये धुक्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी लोणावळा शहर अक्षरशः धुक्याच्या चादरीखाली झाकले जात असून, येथील रस्ते धुक्यात हरवल्याचा भास होत आहे. लोणावळा शहर धुक्यासाठी सर्वपरिचित आहे.
लोणावळा शहर आणि त्यातही खंडाळा बोरघाटाचा बराचसा भाग हा धुक्यात हरवलेला दिसतो. यातच वाहत्या हवेमुळे धुक्याची चादर थोडी जरी दूर झाली की, समोर दिसणार्या हिरव्यागार डोंगररांगा, राजमाची, लोहगड, विसापूर हे किल्ले हे अक्षरशः मन मोहून टाकतात. सध्या शहराचा पारादेखील खाली यायला लागला असून, येथील रात्रीचे तापमान 20 अंशापर्यंत खाली जात आहे. त्यामुळे सध्याचे वातावरण पर्यटकांना लोणावळा शहराकडे आकर्षित करीत आहे