पुणे : पौष महिन्यास सुरुवात झाल्यानंतर गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात फुलांचे व्यवहार थंडावले आहेत. बाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक साधारण असून, त्यांना मागणीही कमी आहे. बाजारातील आवक-जावक कायम असल्याने गत आठवड्याच्या तुलनेत सर्व प्रकारच्या फुलांचे दर टिकून आहेत. थंडीस सुरुवात झाल्याने त्याचा परिणाम गुलछडी आणि लिलीच्या उत्पादनावर झाला आहे. थंडीमुळे या फुलांची आवक रोडावली असून, प्रतवारीतही घसरण झाली आहे.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : 20-40, गुलछडी : 30-50, अॅष्टर : जुडी 8-12, सुट्टा 50-80, कापरी : 10-30, शेवंती : 30-50, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 10-20, गुलछडी काडी : 20-80, डच गुलाब (20 नग) : 80-150, जर्बेरा : 10-30, कार्नेशियन : 80-120, शेवंती काडी 100-150, लिलियम (10 काड्या) 800-1000, ऑर्चिड 400-500, ग्लॅडिओ (10 काड्या) : 60-100, जिप्सोफिला : 100-200.