पुणे

Pcmc Market : फ्लॉवर, भेंडी, कोबी, टोमॅटोची आवक

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  नारायणगाव येथे टोमॅटोचे उत्पादन वाढल्याने बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. सोबतच फ्लॉवर, भेंडी, कोबी आणि मक्याच्या कणसाची देखील आवक वाढली आहे. सर्व पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. तसेच सोलापूरहून आवळ्याची आवक देखील होवू लागली आहे. शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लाल बहादुर शास्त्री भाजी मंडईमधील किरकोळ बाजारात फ्लॉवर, भेंडी, कोबी आणि शेवगा 40 ते 50 रूपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. तर कोथिंबीर, मेथी, पालक, मुळा पालेभाज्या 20 ते 25 रूपये दराने विक्री केली जात आहे; मात्र लसणाचे दर अद्यापही शंभरीपारच आहेत.

मोशी उपबाजारातील आवक ः (क्विंटल)
या आठवड्यात फ्लॉवर 266, भेंडी 90, कोबी 167, टोमॅटो 542, शेवगा 25, कांदा 513, बटाटा 397, आले 32, लसूण 28 आणि मका कणीस 185 क्विंटल एवढी आवक झाली आहे.
घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर ः आले 100 ते 110, लसूण 100, हिरवी मिरची 35 ते 40, फ्लॉवर-कोबी 10 ते 12, टोमॅटो 5 ते 7, कांदा 13 ते 15, बटाटा 13 ते 15, भेंडी 25 ते 30, मटार 70 रूपये दराने विक्री होत आहे.
मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 31600 गड्डी, फळे 216 क्विंटल आणि फळ भाज्यांची 3266 क्विंटल एवढी आवक झाली.

पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव
पालेभाज्या ः दर (प्रति जुडी)
मेथी 20 ते 25
कोथिंबीर 25
कांदापात 15
शेपू 15 ते 20
पुदिना 10
मुळा 10
चुका 10
पालक 20
फळभाज्यांचे ः किलोचे भाव
कांदा 30 ते 35
बटाटा 25 ते 30
आले 150 ते 160
लसूण 150 ते 170
भेंडी 40 ते 50
टोमॅटो 20 ते 25
सुरती गवार 50 ते 60
गावरान गवार 80
दोडका 50
दुधी भोपळा 50
लाल भोपळा 50 ते 60
कारली 50
मटार 100 ते 110
वांगी 50
भरीताची वांगी 60
तोंडली 50
पडवळ 50
फ्लॉवर 40 ते 50
कोबी 50 ते 60
काकडी 30
शिमला मिरची 50
शेवगा 50 ते 60
हिरवी मिरची 60
चवळी 40

SCROLL FOR NEXT