पुणे

राजगुरूनगर : मोजणी कार्यालयात ध्वजारोहण टाळले; अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप

अमृता चौगुले

राजगुरूनगर (पुणे); पुढारी वृत्तसेवा : दुमजली नविन इमारत झाल्यानंतर खेड तालुका भूमिअभिलेख कार्यालय आवारात महाराष्ट्र दिन साजरा झाला नाही. शासकीय आदेश डावलून कार्यालयात या ध्वजारोहण टाळण्यात आले. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या दिवशी शुकशुकाट पाहायला मिळाला. महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सोमवारी (दि. १) खेड तहसील कार्यालयात प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते. तहसिल कार्यालया सह इतर शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करुन महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. तालुका भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयात मात्र कोणताही कार्यक्रम घेतला नाही. तालुका भूमिअभिलेख कार्यालयासाठी नव्याने इमारत झाली आहे. येथे ध्वज स्तंभ उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला २८ एप्रिलला पत्र पाठवले होते. मात्र काम केले नाही, असे मुख्य सहाय्यक महेंद्र म्याना यांनी सांगितले.

तहसील कार्यालयाला जोडुन मागे भूमिअभिलेख कार्यालय आहे. तहसिल कार्यालयातील कार्यक्रमासाठी कोणीही उपस्थित नव्हते. तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी पत्र दिले असताना येथे महाराष्ट्र दिन साजरा झाला नाही. भूमिअभिलेख कार्यालयात नागरिकांची कामे व्हायला खुप अवधी लागतो. चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही. तक्रार केली तर अधिकारी अरेरावी करतात. अर्थिक लाभ घेऊन विरोधकांना गरज असलेले दस्त गहाळ केले जातात. म्हणुन या कार्यालयाबाबत तालुक्यातील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT