पुणे : पुढारी वृत्तसेवा
सहकारनगर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या चव्हाणनगर, शंकर महाराज वसाहत परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास काही अज्ञातांनी पाच ते सहा वाहनांची तोड फोड केली आहे. अशा घटना या परिसरात यापुर्वीही अनेकदा घडल्या आहेत.
मागील काही दिवसांपुर्वी वर्चस्व वादातून व आपली परिसरातील दहशत कायम ठेवण्यासाठी हत्यारधारी गुंडांनी धारधार हत्यारे हातात घेऊन त्याच्या इन्स्टाग्राम रिल्स व्हिडीओ बनवून त्या व्हायरल केल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच ही तोडफोडीची घटना घडली असून, समान्य नागरिकांना पुन्हा वेठीस धरल्याचा प्रकार समोर आला आहे.
संबंधित नागरिकांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली असून, संशयित तिघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.