'पालखी'साठी असणार पाच हजार पोलिस तैनात File Photo
पुणे

Ashadhi wari 2024|'पालखी'साठी असणार पाच हजार पोलिस तैनात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‌गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (दि. ३०) शहरात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी वारकरी तसेच भाविकांची मोठी गर्दी होणार असून, शहरात सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच ठिकठिकाणी सीसीटीव्ही, वॉच टॉवरची नजर असून, गर्दीच्या ठिकाणी गुन्हे शाखेची खास पथके गस्त घालणार आहेत. महिला सुरक्षेसाठी दामिनी मार्शल तैनात असणार आहे. चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी साध्या वेशात पोलिसांची पथके असणार आहेत.

श्रीक्षेत्र देहूमधून जगद्गुरू श्रीतुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. २८ जून), तर संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (दि.२९ जून) आगमन होणार आहे.

रविवारी (दि.३०) दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होणार आहे. पालखी सोहळा रविवारी आणि सोमवारी शहरात मुक्कामी असणार असून, मंगळवारी (दि. २५) पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होणार आहे. नाना पेठेतील श्रीनिवडुंग्या विठोबा मंदिर येथे श्रीतुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असणार आहे. भवानी पेठेतील श्रीपालखी विठोबा मंदिरात श्रीज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा असणार आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आणखी करण्यात आली असून, सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त शहरात तैनात राहणार आहे.

पालख्या शहराबाहेर मार्गस्थ होईपर्यंत पोलिसांकडून नियोजन

रविवारी (दि. ३०) पालखीसोबत लाखो भाविक शहरात मुक्कामी असणार असून, पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषतः मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांकडून मोठा फौजफाटा ठेवण्यात येणार आहे. विविध ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. या माध्यमातून पालख्यांच्या आगमनापासून पालख्या शहराबाहेर मार्गस्थ होईपर्यंत पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी स्वतंत्र पोसिसबंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

सीसीटीव्हींची नजर : गुन्हे शाखेची खास पथके

  • साध्या वेशात गस्त घालणार

  • पालखी सोहळ्यातील गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे भाविकांकडील ऐवज चोरी करतात. सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी

  • रोखण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके साध्या वेशात गस्त घालणार आहे. यासाठी गुन्हे शाखेतील खास बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

एका दृष्टिक्षेपात पालखी सोहळा बंदोबस्त

  • अप्पर पोलिस आयुक्त - २

  • पोलिस उपायुक्त १०

  • सहायक पोलिस आयुक्त २०

  • पोलिस निरीक्षक- १०१ सहायक निरीक्षक,

  • उपनिरीक्षक - ३४३ • पोलिस कर्मचारी

  • ३ हजार ६९३

  • होमगार्ड - ८००

  • राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT