Book donation on Ganesh Chaturthi Pudhari
पुणे

Book donation on Ganesh Chaturthi: श्री गणेशचरणी पाच हजार पुस्तकांचा महानैवेद्य; वाचनसंस्कृतीसाठी अनोखा उपक्रम

जय गणेश व्यासपीठाच्या पुढाकारातून ग्रामीण विद्यार्थ्यांना महाप्रसादरूपाने पुस्तकांचे वाटप

पुढारी वृत्तसेवा

पुणे : चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपती असलेल्या श्री गणेशाच्या जन्मसोहळ्यानिमित्त जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून बुधवारी (दि. 21) श्री गणेशचरणी पाच हजार पुस्तकांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. वाचनसंस्कृती आणि वाचनचळवळ अधिक वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने महाप्रसादाच्या रूपाने या पुस्तकांचे वाटप ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केले जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशी ही पुस्तके आहेत.

जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. अमर लांडे यांनी श्री गणेशाची रांगोळी काढली. त्याभोवती विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठीची हजारो पुस्तके आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली होती.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, नवनिर्वाचित नगरसेवक कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, संदर्भ ग््रांथपाल प्रसाद भडसावळे, शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा जाधव उपस्थित होते. साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयूष शहा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला. कुणाल पवार, राहुल आलमखाने, नंदू ओव्हाळ, विक्रम गोगावले आदींनी उपक्रमात सहभाग घेतला. सुरुवातीस पुस्तकपूजन करण्यात आले. त्या वेळी विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा गजर केला. शालेय विद्यार्थ्यांनी संपूर्ण अथर्वशीर्षपठण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT