पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर पोलिस आयुक्तालयाती पाच निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे. काही दिवसांपासून रिक्त असलेल्या चुतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी खंडणी विरोधी पथक 2 ची जबाबदारी पार पाडणारे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांची निवड करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट 5 जबाबदारी पार पाडणारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना कोथरूड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष शाखेतून संदीपान पवार यांना डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांची विशेष शाखा तर कोथरूड पोलिस ठाण्याचेच गुन्हे निरीक्षक बाळासाहेब बडे यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.